loader
Breaking News
Breaking News
Foto

सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख आयोजित कथालेखन स्पर्धेत रेखा नाबर यांची कथा सर्वप्रथम

देवळे (प्रकाश चाळके) - श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखने स्व. शालिनी आणि स्व. सदानंद बेंदरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या ५व्या खुल्या कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये प्रा. रेखा नाबर, माहीम- मुंबई यांना प्रथम क्रमांक, नंदकुमार इंदिरा पंडित वडेर, सांगली यांना द्वितीय क्रमांक, तर अमित अशोक पंडित, कनकाडी- देवरुख आणि प्रतीक्षा हरिपूरकर, चिंचवड- पुणे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी राजलक्ष्मी संजय सुर्वे- रत्नागिरी, प्राची प्रदीप राव- देवरुख, विनिता वैभव रोठे- बंगळुरू, मोहन कुलकर्णी- अंबरनाथ, प्रशांत पुंडलिक शिरुडे- डोंबिवली, डॉ. राजेंद्र सावळाराम बावळे- राजापूर आणि रवीना किशोर घाणेकर- आडीवरे यांच्या कथांची निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कथालेखन स्पर्धा खुली असल्याने राज्यातील व पर राज्यातील विविध ठिकाणाहून एकूण ४० स्पर्धकांनी आपल्या कथा स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या. यामध्ये संभाजीनगर, लोवले - संगमेश्वर, सातारा, सांगली, अंबरनाथ, चिंचवड- पुणे, डोंबिवली, रत्नागिरी, देवरुख, बडोदा, ठाणे,कोल्हापूर, पिंपळी खुर्द- चिपळूण, नेरूळ- नवी मुंबई, माहीम- मुंबई, चिपळूण, माखजन, कोळकेवाडी, जांभूळ- आड, पुणे, जोगेश्वरी, हातखंबा, इंदोर, नवी मुंबई, कोंडगाव, साखरपा, भाईंदर, राजापूर, नागपूर, चिखली- संगमेश्वर, खडकपाडा- कल्याण, आडीवरे, कनकाडी- देवरूख, बंगळुरू, धायरी- पुणे इत्यादी ठिकाणच्या स्पर्धकांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक इत्यादी विविध राज्यातून स्पर्धेसाठी कथा आल्या होत्या.

टाइम्स स्पेशल

स्पर्धेतील कथांचे परीक्षण बसणी हायस्कूल, रत्नागिरीच्या संस्कृत आणि मराठी विषयाच्या निवृत्त शिक्षिका मा. पद्मजा बापट, रत्नागिरी यांनी केले आहे. वाचनालयाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांनी सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून, सर्व स्पर्धकांना धन्यवाद दिले आहेत. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि.२३ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाळी ठीक १०:३० वा. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलाआहे. तरी सर्व विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिकांचा स्वीकार करण्यासाठी आणि अन्य सर्व सहभागी स्पर्धकांनी सहभाग प्रमाणपत्राचा स्वीकार करण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे, अशी विनंती वाचनालयचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg