loader
Breaking News
Breaking News
Foto

खोडदे येथील अनुज साळवी याला सीबीएसई दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील खोडदे येथील तसेच पीएम श्री. जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर (जि. रत्नागिरी) येथील विद्यार्थी अनुज संदेश साळवी याने शैक्षणिक वर्ष 2026 मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 96.60 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. नवोदय विद्यालयातून तो अव्वल मार्गाने उत्तीर्ण झाला असून परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनुजचे वडील संदेश गजानन साळवी हे व्यावसायिक असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथे “सुयश कॉम्प्युटर” या नावाने संगणक प्रशिक्षण केंद्र चालवतात. त्याची आई सावी संदेश साळवी या महा ई-सेवा केंद्र चालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच आजोबा गजानन साळवी हेही प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. अनुजची बहीण अदिती साळवी हिची देखील नवोदय विद्यालयात निवड झाल्याने साळवी कुटुंबाच्या शैक्षणिक यशात आणखी भर पडली आहे.

टाइम्स स्पेशल

अनुजच्या या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. त्याच्या मेहनतीला आणि जिद्दीला यशाची साथ लाभल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg