loader
Breaking News
Breaking News
Foto

मानेज इंटरनॅशनल स्कूल सी.बी.एस.ई. बोर्ड परिक्षेत शाळेचे घवघवीत यश

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी. बी.एस. ई. बोर्डाच्या शाळेचा २०२५ - २०२६ या शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच लागला. इयत्ता दहावीच्या वर्गातील गुणानुक्रमे तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे - प्रथम क्रमांक अपूर्व अण्णासाहेब बंदसोडे (98.8%), द्वितीय क्रमांक वर्तिक जितेंद्रकुमार दधिच (98.4%), तृतीय क्रमांक कुमारी मैथिली राजेंद्र ठीक (93.80%) या परीक्षेच्या माध्यमातून तीसहून जास्त विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यांहून जास्त गुण मिळवून शाळेची घवघवीत यशाची परंपरा अबाधित राखली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा, शाळेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने, शाळेच्या कार्याध्यक्षा नेहा माने, शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने, शाळेच्या व्यवस्थापिका ईशानी माने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg