दापोली (वार्ताहर) : दापोली पोलिसांनी आज दुपारी इको गाडीतून बेकायदा देशी दारू व बीअरचे बॉक्स यांची वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून २ लाख ३० हजार रुपये किमतीची देशी दारू व बीअरचे बॉक्स व वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी २ वाजणेचे सुमारास दापोली बस स्थानकाजवळील चौकात ट्राफिक जाम झालेले असल्याने दापोली पोलिसांचे एक पथक या वाहतुकीचे नियमन करत असताना त्यांना एक मारुती इको क्रमांक एमएच.०८.आर.८६३६ हि जाताना दिसली. या वाहनात देशी दारूचे तसेच बीअरचे बॉक्स आढळून आल्याने हे वाहन थांबवून चालकाकडे मद्य बाळगण्याचा व त्याची वाहतूक करण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता चालक ऋतिक संतोष लांबे यांनी असा कोणताही परवाना आपल्याकडे नसल्याचे सांगितल्यावर हे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या वाहनात २६ हजार ८८० रूपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, ८ हजार रुपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या, ७ हजार २०० रुपये किमतीचे ५०० मिलीचे ट्युबर्ग बीअरचे ४८ टीन, ९ हजार ६०० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या ट्युबर्ग बीअरच्या ४८ बाटल्या, ७ हजार २० किमतीच्या ६५० मिलीच्या किंगफिशर बीअरच्या ३६ बाटल्या, ३ हजार ६०० रुपये किमतीचे ५०० मिलीचे किंगफिशर बीअरचे २४ टीन, ६ हजार ४८० किमतीचे लंडन प्लीसनर बीअरचे ५०० मिलीचे ४८ टीन, ११ हजार ८८० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या लंडन प्लीसनर बीअरच्या ७२ काचेच्या बाटल्या व १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून दापोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.































2.jpg)





























.jpg)















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.