वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री देव काळभैरव समा उत्सव वेळणेश्वर पंचरस समाज यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील पंचरस समाजाचा समा उत्सव वेळणेश्वर बाजारपेठ सहाण येथे आयोजित करण्यात आला होता. वेळणेश्वर गावची ग्रामदेवता श्री देव काळभैरव, गावराखा, सालबाई देवी, झोलाई देवी, भुताई यांचा शिमगा सणातील पालखी समा महोत्सव वेळणेश्वर गावातील पंचरस समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात.. भक्ती भावाने साजरा करण्यात आला. भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे समा महोत्सव.... या समा महोत्सवाच्या निमित्ताने पंचरस समाज एकत्रित येत असतो.
देव नसलेल्या उघड्या पालखी बरोबर लोटणी घेऊन लोटणीच्या माध्यमातून शक्ती पूजा, कलात्मकता आणि युक्ती यातील गुण दाखवत असतो. या पंचरस समा महोत्सवामध्ये श्री दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळी गुहागर (कल्पेश जांगळी), श्री दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळ गुहागर (दीपक सांगळे), श्री नवलाई देवी ग्रामस्थ मंडळी नरवण (तुषार राऊत), श्री संताजी जगनाडे महाराज मंडळ गुहागर (अरुण रहाटे), असगोली ग्रामस्थ मंडळी (अविनाश कावणकर), गुहागर किर्तन वाडी मंडळी (राजेंद्र भागडे), श्री सुकाई देवी ग्रामस्थ मंडळ अडुर (यशवंत धावडे) यांचा समावेश होता.
या उत्सवादरम्यान सभापती प्रणव पोळेकर, गुहागर तालुका पंचायत समाज अध्यक्ष अरुण रहाटे, काळभैरव देवस्थान अध्यक्ष नाना पोळेकर, देवस्थान सचिव संजय गुरव, गुहागर तालुका भंडारी समाज अध्यक्ष नवनीत ठाकूर, वेळणेश्वर भंडारी समाज अध्यक्ष सतीश मोरे, वेळणेश्वर कुणबी समाज अध्यक्ष महेंद्र पाडावे, वेळणेश्वर मच्छीमार समाज अध्यक्ष संतोष तांडेल, वेळणेश्वर वाडदई अध्यक्ष विनायक कांबळे, वेळणेश्वर भाटी अध्यक्ष गजानन शिरगावकर, गुरव समाज अध्यक्ष एकनाथ जामसुतकर, पुजारी रमेश गुरव या मान्यवरांचा गुहागर तालुका पंचरस समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला, तसेच पंच रस समाजातील सहभागी गावातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेळणेश्वर पंचरस समाज यांनी मेहनत घेतली.































2.jpg)





























.jpg)















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.