loader
Breaking News
Breaking News
Foto

नावडी येथील ग्रामदेवता श्री निनावी देवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न होणार

शास्त्रीपुल (वहाब दळवी) - नावडी (तालुका संगमेश्वर) येथील ग्रामदैवत श्री निनावी देवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकाळी देव-देवतांच्या मूर्तींवर अभिषेक, विशेष पूजा आणि आरती संपन्न होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री निवळी तिठा येथील 'श्री देव रवळनाथ नमन मंडळ, निवळी (रत्नागिरी)' यांचा बहुरंगी नमन हा लोककलेचा कार्यक्रम सादर होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू असून, संपूर्ण मंदिर व प्रांगणात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच भव्य मंडप उभारण्यात आला असून परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

या सर्व कामांमध्ये स्थानिक तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत असून संपूर्ण नावडी परिसरात सध्या मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री निनावी देवी प्रासादिक मंडळ, भंडारी, तेली, नाभिक ज्ञाती बांधव व मित्रमंडळ यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष आणि मानकरी दत्ताराम उर्फ बावा सुर्वे यांनी सर्व भाविकांना दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg