संगलट खेड (इक्बाल जमादार) - कोकण विभागात एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात असलेल्या एकूण १७३ धरणांतील पाणी पातळी तिव्र उन्हाळा आणि बाष्पीभवनाच वाढलेला वेग यामुळे वेगाने खालावू लागली असून १७३ धरणांमध्ये ४८.७७ टक्के म्हणजे १८०६.९७ दशलक्ष घनमिटर उपयूक्त जलसाठा शिल्लक आहे. एप्रिल २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण कोकण विभागात १७० टँकरद्वारे ५२० गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, मे महिन्यात ही टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोकण विभागात रायगड जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात सध्या ६० टैंकर कार्यरत असून १८० वाड्या-वस्त्यातहानलेल्या आहेत. विशेषतः महाड, पोलादपूर, पेण आणि खालापूर तालुक्यांतील डोंगराळ भागात परिस्थिती गंभीर आहे. वाढती मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आता खासगी टँकर अधिग्रहित करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याची पाणी टंचाईची विदारक स्थिती यंदाही कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे याच क्षेत्रात असूनही, एकट्या शहापूर तालुक्यात ३५ टँकर सुरू आहेत. पालघरमधील जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या आदिवासी बहुल पट्ट्यात नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे.
कोकणात दरवर्षी सरासरी ३ हजार मिमी पाऊस पडतो. पुरपरिस्थिती निर्माण होते. मात्र दरवर्षी उन्हाळी पाणी टंचाईला कोकणवासीयांना सामोरे जावेच लागते. कोकणातील तिव्र उताराच्या नद्यामधून पावसाचे पाणी अत्यंत वेगाने वाहात जावून समुद्रास जावून मिळते. सद्यस्थितीत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात असलेल्या एकूण १७३ धरणांतील पाणी पातळी तिव्र उन्हाळा आणि बाष्पीभवनाच वाढलेला वेग यामुळे वेगाने खालावू लागली असून १४ एप्रिल २०२६ रोजी या १७३ धरणांमध्ये ४८.७७ टक्के म्हणजे १८०६.९७ दशलक्ष घनमिटर उपयूक्त जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी ह उपयूक्त शिल्लक जलसाठा ५१.२४ टक्के होता, त्यात यंदा २.४८ टक्क्याने घट झाली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अहवालानुसार, तापमानामुळे मे २०२६ अखेरपर्यंत टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणात मोठे धरण प्रकल्प ११ असून त्यांची जलसंकलन क्षमता २६९३.२१ दशलक्ष् घनमिटर आहे. सद्यस्थितीत हा जलसाठा ४६.१२ टवे म्हणजे १३०८.४७ दशलक्ष घनमिटर आहे.































2.jpg)





























.jpg)















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.