loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर येथे भव्य आयुष्मान भारत मार्गदर्शन शिबिर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्यावतीने गुहागर येथे भव्य आयुष्मान भारत मार्गदर्शन शिबिर तसेच ABHA (आभा) कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल, शृंगारतळी येथे पार पडणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना आयुष्मान भारत योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, मोफत आरोग्य सुविधांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच ABHA कार्ड सोप्या प्रक्रियेद्वारे तात्काळ तयार करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आदरणीय आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते होणार आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून, परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg