loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथे २५ एप्रिल रोजी अध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील काडसिध्देश्वर सांप्रदायिक भक्त मंडळी यांच्या वतीने येत्या शनिवार २५ एप्रिल रोजी ग्रामपंचायत पंटागण साटेली भेडशी येथे आध्यात्मिक सत्संग सोहळा तसेच काडसिध्देश्वर स्वामी कणेरी मठ कोल्हापूर यांचे मार्गदर्शन दर्शन सोहळा आयोजित केला आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भक्त मंडळी दोडामार्ग यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी दि. २५ एप्रिल २०२६ रोजी श्री एस.एस. परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज ४९ वे मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ, कोल्हापूर (महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ९.०० वाजता सामूहिक स्तोत्र, संध्याकाळी ५.२० वाजता सामूहिक स्तोत्रज्ञ, संध्याकाळी ६.३० वाजता स्वामी महाराजांचे आगमन, शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली, संध्याकाळी 7 वाजता तत्वज्ञान आणि प्रवचन, रात्री 8.30 सर्वांसाठी दर्शन, आरती व महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दोडामार्ग तालुका भक्तमंडळी यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg