loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हा महिला मोर्चाच्यावतीने पदयात्रा

रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील महिलांना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर करून महिलांना सन्मान दिला आहे. त्यांच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. 16) रत्नागिरी येथे जयस्तंभपासून लक्ष्मी चौकपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनिल राणे, रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, अभिजित गुरव, सुप्रिया उतेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित निकम, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg