पनवेल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी पनवेल येथे दिनांक ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ७०+ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना आरोग्य योजनेची मोफत नोंदणी करून त्यांना लॅमिनेटेड आयुष्यमान वय वंदना कार्ड वाटप करण्यात आले. दिनांक १२ एप्रिल रोजी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करून शिबिरार्थींची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. दिनांक १३ एप्रिल रोजी मोफत रोजगार मार्गदर्शन व शासकीय विविध कर्ज अर्ज नोंदणी मेळावा घेण्यात आला.
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस किशोर देवधेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुहिक त्रिसरण, पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली. यामध्ये किशोर देवधेकर यांनी रोजगार मार्गदर्शन केले. व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे रायगड जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र साळवी यांनी शासकीय कर्ज योजनेचे मार्गदर्शन केले व प्रत्येकाला कर्ज अर्जाचे वाटप करून अर्ज भरून घेतले. मेळाव्यास उपस्थित असलेल्यांच्या विविध समस्या व प्रश्नोत्तराचे समाधानकारक उत्तर देण्यात आले.
सदर कार्यक्रम किशोर देवधेकर अध्यक्ष दृष्टी फाउंडेशन, कार्याध्यक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे रायगड जिल्हा व्यवस्थापक साळवे, सागर तळे, प्रज्ञेश, बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक ७४१ चे अध्यक्ष नथुराम साखरे, डॉ. सुखदेव कांबळे, दृष्टी फाउंडेशन संस्थेच्या सचिव नम्रता देवधेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य, अर्जुन गवळी आदी प्रमुख उपस्थित होते. गरजुनी सदर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. सामाजहिताच्या उपक्रमातुन डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आल्याने दृष्टी फाउंडेशनचे कौतुक करण्यात येत आहे.































2.jpg)





























.jpg)















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.