loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड येथील नातूनगर स्टॉप येथे भीषण अपघात

रत्नागिरी :[ राजन बोडेकर ] मुंबई-गोवा महामार्गावर नातूनगर येथे उभ्या गॅस टँकरला झायलोची भीषण धडक बसून मोठा अपघात झाला . आज सायंकाळी सुमारे 5:40 वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील नातूनगर स्टॉप येथे भीषण अपघात झाला. झायलो क्रमांक MH 08 Z 3692 या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरला गाडीने जोरदार धडक दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात एक जागीच मृत्युमुखी पडला तर चार जखमी झाले आहेत .घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली मोफत रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच जय हिंद ॲम्बुलन्स आणि 108 ॲम्बुलन्सच्या पथकांनीही तत्पर मदतकार्य केले. अपघातातील जखमींना ॲम्बुलन्स चालक सुरज हंबीर यांच्या मदतीने तातडीने भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

भीषण अपघातात अब्दुल अच्चीस जसनाईक (वय 4 वर्ष), सबिया मारूख जस नाईक (वय 33),सेहरा मारुख जसनाईक (7 वर्ष) , इमरान मुरात जसनाईक ( वय 45) हे जखमी झाले आहेत .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg