बांदा (प्रतिनिधी) - आमची वाडी देऊळवाडी मित्र मंडळ आयोजित खुल्या नरकासुर स्पर्धेला यंदाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. या भव्य स्पर्धेत माऊली स्पोर्ट, सांस्कृतिक क्लब सरमळे पेडणे (गोवा) संघाने अव्वल कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला श्री. शैलेश लाड पुरस्कृत रोख रुपये १५,००० व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दळवी वाडा कला क्रीडा मंडळ, माजगाव-सावंतवाडी हे उपविजेते ठरले असून त्यांना ₹१०,००० चे बक्षीस प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बांदा सरपंच प्रियांका नाईक, महिला भाजप जिल्हा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, उपसरपंच राजाराम (आबा) धारगळकर, बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, साई काणेकर, सामाजिक कार्यकर्ते शैलेश केसरकर, मंदार कुडव, पत्रकार निलेश मोरजकर, लवू परब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
सरपंच प्रियांका नाईक म्हणाल्या, “गेल्या सात वर्षांपासून आमची वाडी देऊळवाडी मित्र मंडळ ही परंपरा जपत आहे. गावातील युवकांनी एकत्र येऊन सांस्कृतिक उपक्रम चालवणे ही अभिमानाची बाब आहे.” तर श्वेता कोरगावकर यांनी म्हटले, “ही स्पर्धा शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने राबवण्यात आली असून प्रत्येक संघाने उत्कृष्ट कला आणि कौशल्य दाखवले आहे.” बांदा मर्यादित नरकासुर स्पर्धेत श्री देव बनखंनकर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, काळसेवाडी-सुतारवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना श्री. राजाराम (आबा) धारगळकर पुरस्कृत ₹४४४४ चे बक्षीस मिळाले. द्वितीय क्रमांक ₹२२२२ चे बक्षीस कट्टा कॉर्नर मित्र मंडळ, बांदा यांना देण्यात आले. तसेच “नरकासुर वध” या देखाव्यात कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून आशिष सावंत, आकाश सावंत, गौरांग साळगावकर, देवेश वारंग यांनी जबाबदारी पार पाडली. यंदा गोव्यातून आलेल्या माऊली स्पोर्टच्या सुमारे ३० ते ३६ फूट उंच अशा भव्य नरकासुर प्रतिमेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बांदा येथील स्टॅच्यू कलाकार प्रशांत सावंत यांनी आपली कलाकृती सादर केली. दिवाळी स्पेशल लकी ड्रॉ कूपन योजनेंतर्गत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यात प्रथम बक्षीस रेफ्रिजरेटर अरविंद सावंत (बांदा), द्वितीय वॉटर कुलर आणि तृतीय इलेक्ट्रिक गिझर सुभाष शिरोडकर यांनी जिंकले. बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळाराम शिरोडकर व राकेश परब यांनी केले. व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी पियुष कंगुटकर यांनी केली. या कार्यक्रमाच्या यशासाठी आमची वाडी देऊळवाडी मंडळातील आंबा धारगळकर, सिद्धेश शेवडे, राकेश परब, निलेश मोरजकर, सुनील माजगावकर, महादेव शेगडे, हर्षद कामत, गुरूनाथ साळगावकर, देवेश वारंग, आशिष सावंत, रोहन सुपल, आकाश सावंत, गौरांग साळगावकर, संकेत माजगावकर, मयूर परब, सर्वेश मुळ्ये, निखिल साळगावकर, प्रथमेश साटेलकर, भाग्येश धुरी, भरत माजगावकर, रुपेश माजगावकर, सिद्धेश कोरगावकर, प्रसाद गवंडी, आशु माजगावकर, रुषिकेश सावंत, तनय आरोलकर, अक्षय मयेकर, सुजल नाईक, भास्कर सावंत, प्रशांत सावंत या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. बांदा व परिसरातील हजारो प्रेक्षकांनी उपस्थित राहून ही भव्य स्पर्धा मोठ्या उत्साहात अनुभवली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.