loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ. साक्षी वंजारी यांची फेरनियुक्ती

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : ​सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ. साक्षी समीर वंजारी यांची पुन्हा एकदा नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी महिला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षा म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाचा अनुभव आणि निष्ठा लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा एकदा ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नियुक्तीनंतर बोलताना सौ. वंजारी यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "देशाच्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्का लांबा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, तसेच सिंधुदुर्ग प्रभारी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या मोठ्या जबाबदारीबद्दल मी सर्व वरिष्ठ नेत्यांची मनःपूर्वक ऋणी आहे." ​महिला सशक्तीकरण, समाजातील प्रश्नांवर आवाज उठविणे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी मी निष्ठेने कार्य करणार आहे, असे सौ. साक्षी वंजारी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या फेरनियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला काँग्रेसला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg