loader
Breaking News
Breaking News
Foto

अक्कलकोट- गाणगापूर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय , दिवाळी निमित्त २० तास दर्शन

अक्कलकोट स्वामी समर्थाचे मूळस्थान असलेले वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे 20 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक,पालखी,मंगलस्नान असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत. दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे 3 ते रात्री 9 असे 18 तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी मंदिर खुला राहणार आहे.पहाटे पासून दुपारी 12 पर्यंत विधिवत पूजा, अभिषेक असणार आहे. दु.1 वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवाळी सुट्टयांचा कालावधी म्हणजे आजच्या धावपळीत कुटुंब एकत्र येण्याचा काळ आहे.हा काळ सत्कर्णी लागावा आणि भविष्यातील जीवन सदाचाराने जगता यावा यासाठी या दिवाळी सुट्ट्यांच्या काळात पुणे,मुंबईसारख्या महानगरासह देशभरातून अपार श्रद्धेने स्वामी भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येत असतात.भक्तांना दर्शन सुलभरीत्या मिळावे याकरिता दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे 16 ऑक्टोबरपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या कालावधीत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे 3 ते रात्री 11 असे नियमितपणे 20 तास खुले राहणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg