loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभवे येथे कारला अचानक आग; सुदैवाने कार मधील प्रवासी वाचले

दापोली (प्रतिनिधी) - दापोली-खेड मार्गावर कुंभवे येथे शनिवारी दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. नफिज मुकादम यांच्या मालकीची रेनाॅल्ट कंपनीची ट्रिबर कार दापोलीकडून कुंभवे शाळेजवळ आली असताना कार ने काही समजण्याच्या आधीच अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच कार जळून खाक झाली. घटनेच्या वेळी कारमध्ये नफिज मुकादम यांच्यासह आणखीन ४ जण प्रवास करत होते. सुदैवाने त्यांनी तत्काळ गाडीतून बाहेर पडत जीव वाचवला त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. काही क्षणांतच गाडीला जोरदार आग लागली आणि काही मिनिटांतच ती संपूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg