loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा; ४ ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी)- ​सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि 'आम्ही आपल्या सोबत आहोत' याची शाश्वती देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सावंतवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात एकूण चार ठिकाणी - सावंतवाडी पोलीस ठाणे, आंबोली, सातार्डा व मळेवाड येथे या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावंतवाडी पोलीस ठाण्यात ४०, आंबोली दूरक्षेत्र येथे ३५, मळेवाड येथे ४०, आणि सातार्डा येथे २५ अशा एकूण १४० ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. ​यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

तसेच, फसवणुकीचे प्रकार टाळण्याबाबत आणि सायबर गुन्ह्यांविषयी जागृती करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. ​पोलिसांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आणि त्यांच्यासोबत संवाद साधल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त केले. हा उपक्रम पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg