loader
Breaking News
Breaking News
Foto

१९ ऑक्टोबरला दापोली तालुका किशोर/किशोरी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

दापोली (प्रतिनिधी) - जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दापोली तालुका किशोर/किशोरी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रविवारी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ठिक २ वाजता ए.जी. हायस्कूल दापोलीच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करावे अशाप्रकारचे आवाहन नितीन बांद्रे कार्यवाह दापोली तालुका कबड्डी असोसिएशन यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत सहभागी होणारा किशोर/किशोरी गटातील स्पर्धक हा १ डिसेंबर २००९ व त्यानंतर जन्मलेला असावा. त्याचे वजन ५५ किलो ग्रॅम च्या आतमध्ये असावे खेळाडूने निवड चाचणी स्पर्धेसाठी येताना सोबत आपले शाळा शिकत असल्याबाबतचे बोनाफाईड सर्टिफिकेट, जन्मदाखला, आधारकार्ड, शाळा प्रवेश निर्गम उतारा यापैकी एक कागदपत्र सोबत आणावे, असे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg