loader
Breaking News
Breaking News
Foto

तंबाखूजन्य पदार्थसाठा बाळगणार्‍या इसमाला अटक, मुद्देमाल जप्त

संगलट खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाने घातलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीला धाब्यावर बसवून बेकायदेशीर साठा बाळगणार्‍या इसमाला वडखळ पोलिसांनी शनिवारी सकाळी रंगेहात पकडले. ही कारवाई काराव गाव हद्दीतील सर्व्हिस रोडवरील एका दुकानासमोर करण्यात आली. आरोपीचं नाव फरहाद नसरुद्दीन अंसारी (वय ३६, रा. वडखळ, ता. पेण, जि. रायगड, मूळगाव धनपुरा, जि. बिजनोर, उत्तर प्रदेश) असं आहे. पोलिसांनी तपासादरम्यान अंसारीच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या पिशवीतून केसरयुक्त विमल पान मसाला आणि व्ही-१ तंबाखू असा एकूण ४,८४० किंमतीचा गुटखा साठा जप्त केला. तसेच, आरोपीकडून काळ्या रंगाची होंडा अ‍ॅक्टिवा (एमएच-०६-सीएच-१९८४) अंदाजे ४५,००० किंमतीची वाहनही जप्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारवाईत तक्रारदार म्हणून रुपेश शंकर कोंडे (वय ४१, पोलीस नोकरी) यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा क्र. १२४/२०२५ दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री व साठवणुकीवर पूर्ण बंदी घातली आहे. तरीही आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपायकारक आणि आरोग्यास घातक पदार्थाची वाहतूक केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२३ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg