ठाणे (अमोल पवार) - दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागातील सहायक संचालक, नगर रचना (गट-अ/राजपत्रित) संवर्गातील आठ अधिकाऱ्यांना उप संचालक, नगर रचना या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देऊन एक दिवाळी गिफ्ट अधिकाऱ्यांना दिले आहे.या मध्ये सर्वाधिक तरुण आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेत सहायक संचालक नगररचना या पदावर कार्यरत असलेले संग्राम कानडे यांनाही पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. संग्राम कानडे यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स नवी दिल्ली येथून नगररचना विभागात पदव्युत्तर पदवी संपादित केली असून एमबीए पदवी घेतली आहे.
तसेच प्रणव बबनराव कर्पे (पदस्थापना ठिकाण मंत्रालय ),विनय पंढरीनाथ झगडे (पदस्थापना ठिकाण पुणे मनपा),महेंद्र निळकंठ परदेशी (पदस्थापना ठिकाण महाराष्ट्र राज्य,पुणे),कविताकौर प्रितमसिंह कामठेकर(पदस्थापना ठिकाण प्रादेशिक पालघर),अभिजीत भास्कर केतकर (दिव्यांग)(पदस्थापना ठिकाण एम.एस.आर.डी.सी.पुणे),स्मिता आनंदराव कलकुटकी (पदस्थापना ठिकाण पुणे महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण),मुजम्मिल अजमुद्दीन मुल्ला(पदस्थापना ठिकाण अहिल्यानगर मनपा) या अधिकाऱ्यांची देखील उप संचालक, नगर रचना या पदावर पदोन्नतीचे आदेश महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाचे सह सचिव सुबराव शिंदे यांनी निर्गमित केले आहे.
ठाणे महापालिका येथे सहायक संचालक नगररचना पदावर कार्यरत असलेले संग्राम कानडे हे माजी आमदार लहू कानडे यांचे सुपुत्र असून यापूर्वी त्यांनी पालघर, नाशिक येथे यशस्वीपणे काम केले आहे. वडील प्रशासकीय अधिकारी आणि पुढे राजकारणी असताना संग्राम कानडे यांनी शासनाच्या सेवेत काम करण्याचे ठरविले पालघर येथे सहायक संचालक पदी काम करताना त्यांनी वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या शहरांचा विकास योजना आराखडा तयार केला होता व त्यासाठी शासनाने पहिला उत्कृष्ट सहायक संचालक नगर रचना साठी स्वराज्य अभियंता हिराजी इंदुलकर २०२३ हा पुरस्कार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे हस्ते त्यांना देऊन त्यांचा सन्मान केला होता. ठाणे महानगरपालिका येथे काम करताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबवले, यामध्ये बुलेट ट्रेन स्टेशन एरिया प्लॅनिंग करिता सर्व घटकांना सामावून घेऊन नियोजन करणे करीता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमीनार आयोजित केला तसेच ठाणे शहराची विकास योजना देखील त्यांच्या कार्यकाळात शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. याचबरोबर त्यांनी शहर विकास विभाग अधिक पारदर्शी काम करेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कानडे यांच्या कारकीर्दीत ठाणे महापालिकेच्या नगर विकास विभागाने २०३५-२०२६ या चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२५पर्यंत २०० कोटी २२ लाख उत्पन्न प्राप्त करून दिले दरम्यान १ एप्रिल २५ ते १६ ऑक्टोबर २५ पर्यंत २०० कोटी २२ लाख रूपयाचे उत्पन्न ठामपाला प्राप्त करून कानडे यांनी मोलाचे काम केले आहे. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.