loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले पर्यावरणपूरक आकाशकंदील

मालवण (प्रतिनिधी) - प्लास्टिकपासून बनविलेल्या आकाश कंदीलला पर्याय म्हणून पर्यावरण पूरक आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे घेण्यात आली. यामध्ये मुलांनी जुन्या काठाच्या साड्या तसेच रंगीत कागद, पुठ्ठा इत्यादी पर्यावरण पूरक साहित्याद्वारे आकर्षक असे आकाश कंदील बनविले. मुलांमधील सृजनशीलता, सौंदर्य दृष्टिकोन, कृतीशीलता, संघभावना ही मूल्ये रुजवण्यासाठी तसेच टाकाऊ पासून शोभिवंत वस्तू तयार करता याव्यात या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेसाठी कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यावरण पूरक कंदील बनविल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक भाट तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मुलांचे कौतुक केले. तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त - कर्नल शिवानंद वराडकर, अ‍ॅडव्होकेट एस एस पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका यांनीही कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg