दापोली (प्रतिनिधी) - आसूद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.आसुद च्या वतीने ग्राहकांना विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, दूचाकी, चारचाकी वाहनांसोबतच सोफासेट, कपाटे, शेतिविषयक औजारे, मोबाईल हँण्डसेट वैगरे अत्यावश्यक वस्तू उत्तम प्रतीच्या ब्रॅण्डेड मिळाव्यात तसेच ग्राहकांना खरेदी करण्यासाठी सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे या उद्देशाने आसुद सोसायटीच्या आवारात महालोन मेळाव्याचे आयोजन केले होते. या महालोन मेळाव्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सलग तिस-या वर्षी आसुद सोसायटी यशस्वी ठरली आहे. दापोली तालुक्यात आसुद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.आसूद नावाची शेतिविषयक औजारे, खते, बी बियाण्यांसह आर्थिक पत पुरवठा करून शेतकरी सभासदांच्या लहान मोठ्या गरजा भागवणारी एक संस्था आहे.
या संस्थेचे सचिव चंद्रशेखर देपोलकर यांच्या सुयोग्य आणि कल्पक मार्गदर्शनाखाली चेअरमन मंगेश बांद्रे व्हाइस चेअरमन वैभव वराडकर तसेच संचालक मंडळाच्या सहकार्याने काम करत केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर कोकण विभागात सातत्याने विविध प्रकारचे शासनाचे मानाचे पुरस्कार मिळून आपल्या नाव लौकीकाचा ठसा सहकार क्षेत्रात चांगलाच उमटवला आहे. अशा या संस्थेने केवल संस्थेचा व्यवसाय म्हणून नव्हे तर तालुक्यात सर्वांनाच अल्प व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देत दिवाळीनिमित्त विविध वस्तू खरेदी करण्यासाठी एक नामी संधी उपलब्ध करून दिली. महालोन मेळाव्याचे आयोजन करणारी तालुक्यातील एकमेव संस्था आहे.
अशाप्रकारचा उपक्रम राबविण्याचे सलग तिसरे वर्ष असून वाढती मागणी आणि उस्फुर्त प्रतिसाद यामुळे यावर्षी तीन दिवस महालोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महालोन मेळाव्याचे उदघाटन दापोली सहाय्यक निबंधक अनिता बटवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन मंगेश बांद्रे, व्हाईस चेअरमन वैभव वराडकर, सचिव चंद्रशेखर देपोलकर, संचालक कीर्ती कुमार वेलदुरकर, वैभव धामणे, शब्बीर ऐनरकर, सुभाष बेनेरे, विलास बांद्रे, राजेश कातळकर, रसिका इंदुलकर, वनिता येद्रे, रजिमस बँक सहायक सर व्यवसस्थापक मोहित, शाखाधिकारी शिंदे आसूद ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिर्के, सल्लागार दिलीप बांद्रे, रघुनाथ चव्हाण, साळदुरे चे अध्यक्ष निलेश खेडेकर संस्थेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.