loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्तम फोंडेकर आणि आबा फोंडेकर यांनी पाचव्यांदा पाठविली हापूस आंब्याची पहिली पेटी

मालवण (प्रतिनिधी) - गेली पाच वर्षे सातत्याने मालवण कुंभारमाठ येथून हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबई पुणे सह परजिल्ह्यात पाठविणारे पुरस्कारप्राप्त आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांनी आज दीपावलीच्या मुहूर्तावर दोन डझन हापूस आंब्याची पेटी सातारा येथे अवधूत शिंदे यांच्याकडे पाठविली आहे. सिंधुदुर्ग विशेषतः मालवण मधून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविणारे उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर हे प्रगतशील आंबा बागायतदार म्हणून ओळखले जातात. गतवर्षी फोंडेकर यांनी पाठविलेल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला जागतिक मानांकन प्राप्त झाले होते. उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg