वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सास्कृतिक कला क्रिडा मडळ रत्नागिरी या संस्थेने महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन दिनांक २५ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे संपन्न होत आहे. केवळ महिलांनी चूल आणि मुल न साभळता पुरुषाच्या बरोबरीने काम करायलाच हवे आणि म्हणूनच या मंडळाने कोकणची नमन कला हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न सफल होताना दिसत आहे. वय वर्षे ७२ ते १५ वयोगटातील या महिला कलाकारांनी सादर केलेले नमन हे एक शिवधनुष्य उचलल्या सारखेच आहे. आता या नमन मडळाचा कार्यक्रम शनिवार दि २५/१०/२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केद्र चिपळूण येथे होणार आहे.
लेखक दिग्दर्शक नमनसम्राट यशवंत वाकडे, निर्माता साईनाथ नागवेकर, आभारचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, विशेष सहाय्य दादा वाडेकर, शरद गोळपर, मदन डोर्लेकर, वसंत घडशी, सुत्रधार वासुदेव वाघे, सागर मायगडे हे सहाय्य करत असून या नमनातील गीते सर्वता चव्हाण यांनी लिहलेली असून मुख्य गायिका आकांक्षा वायंगणकर, सर्वता चव्हाण, वेदा शेट्ये या गीते गात आहेत. यामध्ये कलाकार प्रेरणा विलणकर, ज्योती कदम, रेश्मा शिंदे, पूनम गोळपकर, अर्चना मयेकर, रेखा खात, विनया काळप, मनस्वी साळव, सर्वता चव्हाण, रिमा देसाई, गीता भागवत, पूर्वा चव्हाण, समिक्षा वालम, आकाक्षा वायंगणकर, तन्वी नागवेकर, शीतल सकपाळ, जुई पावसकर, शोभना वरवटकर, शमिका विलणकर, वेदा शेट्ये, माधवी पाटील, स्वीटी पावसकर, निधी वरवटकर,या भूमिका करत आहेत, तर नेपथ्य रचना बावा आग्रे हे सांभाळत आहेत. तरी चिपळूण येथील हा महिलांनी सादर केलेला नमनाचा कार्यक्रम आवर्जून पहावा व या सर्व कलाकारांना प्रोत्साहन करावे, असे रसिक श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.