loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन 2025 साठी रोटरी स्कूलचा स्पंदन धामणे करणार महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व

खेड - (प्रतिनिधी) - रोटरी स्कूलचा स्पंदन गौरव धामणे या विद्यार्थ्याची दिनांक 18 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान भोपाळ येथे होणाऱ्या एन.सी.ई.आर.टी., नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या 52 व्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन 2025 मध्ये निवड झाली आहे. स्पंदन याचे कमी इंधनात आणि प्रदूषण टाळणाऱ्या ’घूमर द स्पिन अँड जर्क लाँचर’ या विज्ञान मॉडेलला खेड तालुकास्तरावर व रत्नागिरी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक तसेच राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचे हे मॉडेल पारंपारिक रॉकेट लॉन्चिंग पद्धतीला पर्याय ठरले. स्पंदन याची राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन 2025 मध्ये निवड झाली आहे, हे कळताच प्रशालेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पंदनला शर्वरी धामणे, रिया पवार आणि सर्व विज्ञान विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पंदनचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg