खेड (वार्ताहर) : - येथील गट क्रमांक १ चा वर्षावास कार्यक्रम नुकताच मंगलमय वातावरणात पार पडला. या कार्यकमास खेड, चाकाळे, सुसेरी नं १, चिंचघर, कोळकेवाडी, मधील सर्व पुरुष कार्यकारिणी महिला कार्यकारिणी गटाचे कार्यकारिणी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वजारोहण गट अध्यक्ष अजित मोहिते, श्वेता पवार, स्वाती जाधव यांच्या हस्ते करून ध्वजवंदना बौद्धचार्य अमोल कांबळे, किशोर शिर्के यांनी म्हटली. यानंतर तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सर्व कार्यकारिणी दीपप्रज्वलीत केले. प्रास्तविक मानसी शिर्के यांनी केले. खेड शाखेच्या महिलांनी स्वागतगीत म्हटले व उपस्थित शाखा कार्यकारिणी, आणि धम्मदान देणार्या व्यक्तीचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच वर्षावास कार्यकमाचे प्रमुख धम्मदेसना देणारे श्रामनेर बौद्धाचार्य हिरामण मोहिते यांचे स्वागत शाखेचे व गटाचे अध्यक्ष अजित मोहिते, अशोक जाधव यांनीेकेले. नंतर बुद्धपूजा सुमधुर वाणीतुन बौद्धाचार्य किशोर शिर्के, अमोल कांबळे, हिरामण मोहिते यांनी केले. ध्यानधारणा अमोल कांबळे यांनी सूंदर पद्धतीने घेतली. सर्व वातावरण मंगलमय झाले. त्यानंतर श्रामनेर बौद्धाचार्य हिरामणजी मोहिते यांनी पंचशीलाचे महत्व व पालन केल्यावर संपूर्ण मानवजातीला होणारे फायदे व नुकसान यावर मार्गदर्शन केले. मंगलमैत्री करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेवटी खेड शाखेचे विहार कमिटी अध्यक्ष रवीउदय जाधव यांनी गटाचे आभार मानले.
गट महिला अध्यक्षा श्वेता पवार यांनी सुद्धा महिलांचे आभार व्यक्त केले. तसेच गट अध्यक्ष अजित मोहिते यांनी ज्या लोकांनी वर्षावास कार्यक्रमास मदत केली, त्या सर्वांचे व गटाकडून होणारे उपक्रम व अंधश्रद्धा यावर बोलून आभार व्यक्त केले. धम्मपालन गाथा सरनतय घेऊन कार्यक्रम समाप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटाचे सरचिटणीस (बौद्धाचार्य) अमोल कांबळे, अक्षय गमरे, अनिल पवार यांनी केले. विशेष सहकार्य भारत शिर्के, विनोद गमरे, उदय गमरे, रमेश कासारे, सुरज उपावले, भरत पवार, रवींद्र पवार, विष्णू शिर्के, प्रतिभा मोहिते, विशाखा जाधव, मेघा उपावले, समता मोरे, रेश्मा गमरे, वासंती शिर्के, वनिता जाधव, अलका पवार यांनी केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.