loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वदेशीचा संदेश, आत्मनिर्भर भारताची दिशा; रत्नागिरी शहर भाजपचा आगळावेगळा उपक्रम

रत्नागिरी - भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे “आत्मनिर्भर भारत” आणि “स्वदेशी वापरा” या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देत या कर्मचाऱ्यांना स्वदेशी बनवलेल्या बॅगमध्ये दिवाळी फराळ व दिवाळी साहित्य देण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच कष्ट करणाऱ्या नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाचे तोंड गोड करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला 155 कर्मचारी उपस्थित होते.फराळ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्यांनी दिलेल्या आशीर्वादातून त्यांच्या समाधानाची झलक स्पष्टपणे जाणवली. अनेक कर्मचाऱ्यांनी “आमच्या कामाचे कौतुक झाल्यामुळे खूप बरे वाटले,” अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमावेळी सौ. सत्यवती बोरकर, नितीन गांगण, प्रसाद बाष्ट्ये, केतन कडू, सिद्धेश कडू, विजय माळवदे, सौ. कामना बेग, मनोर दळी तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून रत्नागिरीतून “स्वदेशीचा संदेश” आणि “आत्मनिर्भर भारत” घडविण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg