loader
Breaking News
Breaking News
Foto

अमृत दुर्गोत्सव २०२५ अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेला अभिनंदन पत्र प्राप्त

गावखडी (वार्ताहर) - साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होऊन गेलेले महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलेल्या बारा दुर्ग. यापैकी दीपावली सुट्टीत एखाद्या दुर्गाची प्रतिकृती काढून त्या प्रतिकृती सोबत सेल्फी काढून अमृत दुर्गोत्सव २०२५ च्या वेबसाईट वर फोटो अपलोड करण्यासाठी सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी या शाळेने एक दुर्ग, किल्ले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून सेल्फीने सहभाग नोंदवला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे या शाळेला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेला प्राप्त झाले आहे. यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, ऐश्वर्या गुरव, सर्व शिक्षक वृंदांचे आणि इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये, उपाध्यक्षा सुजाता गोठणकर, शिक्षण तज्ञ संतोष कुरतडकर, सर्व पदाधिकारी पालक आणि ग्रामस्थ, पूर्णगड केंद्राचे केंद्रप्रमुख संजय राणे यांनी सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg