दापोली (शशिकांत राऊत) - दापोली बाजारपेठेत दर वर्षी कार्तिकी एकादशी उपवासाच्या दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी महिला कणगर विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र यावर्षी पंधरा दिवस आधीच कणगर विक्रिसाठी दाखल झाले आहेत. त्यांचा खपही मोठ्या प्रमाणात होत आहे. एकादशीचा उपवास असो, संकष्टी चतुर्थी असो वा अंगारकी चतुर्थी असो नाहीतर कोणत्याही निरंकार उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, उपवासाची बटाटयाची भाजी, फिंगर चिप्स, फळे, चवळी आदींचा उपवासाच्या दिवशी फराळ केला जातो तसे कणगर या कंदमुळाचेही उपवासात फराळाला महत्त्व आहे. उपवासाच्या दिवशी कणगर उकडून खाल्ले जाते. जमिनीखाली वाढणार्या वनस्पतींना कंदमूळं असं म्हणतात. उपवासाच्या दिवशी किंवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमुळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे त्वरीत ऊर्जा मिळू शकते.
कणगर बाहेरून लाल आणि आतून पाढर्या रंगाची असतात. पचनास हलकं असल्यामुळे तुम्ही कणघर कधीही खाऊ शकता. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी कणघर उकडून खाल्ले जाते. कणगरमध्ये फायबर्स, व्हिटॅमिन ए, बी ६, सी, डी आणि ई, पोटॅशियम, लोह असतात. जे आरोग्यासाठी चांगले आहेत. कंदांतील सर्वात पौष्टिक कणगरचा कंद. कोकणात हा पावसाळ्यात अनेक ठिकाणी शेतकरी उत्पादन घेण्यासाठी म्हणून लावतात. कणगरला पांढरी रताळी असेही म्हणतात. हे कंद मातीत झुबक्याने लागतात. ते आकाराने लांबट गोल असून त्यावर थोडेसे उंचवटे असतात. एका कणगरचे वजन अंदाजे १०० ते १५० ग्रॅम असते. हे उकडून किंवा चुलीतील राखेत भाजून खातात. आजारातून उठलेल्या व्यक्तीस ताकद येण्यासाठी हा कंद खायला दिला जातो.
दापोलीत खेडेगावात शेतीबरोबरच कणगराची लागवड घरामागील परसात अथवा तरवा तयार करुन केली जाते. त्या कणगराचे उत्पादन हे दापोली बाजार पेठेत विक्रीसाठी आणले जाते. एरव्ही कणगराचा खप तेवढा होत नसला तरी उपवासानिमित्त कणगरांची विक्री मोठ्या प्रमाणात होते तसे कार्तिकी एकादशीच्या उपवासाच्या आदल्या दिवशी दापोली तालुक्यातील विविध ठिकाणच्या गावागावातून दापोली बाजारपेठेत विक्री करिता दरवर्षी मोठ्या प्रमाणात कणगर आणले जातात मात्र बदलत्या वातावरणामुळे यावर्षी कणगर तयार झाली असून कार्तीकी एकादशी च्या आधीच विक्रेत्यांनी आणलेल्या कणगरांची विक्री प्रती किलो १४० रुपये दराने विक्री सुरू आहे. नव्याची नवलाई आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कंदमुळं म्हणून कणगरांची विक्रि हातोहात होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून कणगर घेऊन दापोलीत विक्री करिता आलेल्या कणगर विक्रेत्यांच्या चेह-यावर मात्र चांगलेच समाधानाचे भाव पाहायला मिळतात.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.