loader
Breaking News
Breaking News
Foto

चोरट्या वाळूने भरलेला डंपर ग्रामस्थांनी दिला पोलिसांच्या ताब्यात

दापोली (वार्ताहर) : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश धाब्यावर बसवून आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात वाळूचा सक्शन पंपाच्या सहाय्याने उपसा होत असूनही स्थानिक महसूल विभाग त्याकडे कानाडोळा करत आहे. मात्र आता नागरिकांनी वाळू चोरीप्रकरणी कडक भूमिका घेतली असून आज देहेण येथे वाळूने भरलेला एक डम्पर अडवून ठेवला. महसूल विभागाला याची माहिती दिल्यावर तब्बल ३ तासांनी महसूल विभागाचे अधिकारी तेथे पोहचले व पंचनामा करून हा वाळूने भरलेला डम्पर त्यांनी वाळूसह ताब्यात घेवून दापोली येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवला आहे. याबाबत दापोली तालुक्यातील देहेण येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी १० चे सुमारास आंजर्ले ते कादिवली मार्गावरील देहेण येथे कर्नाटक पासिंगचा एक वाळूची वाहतूक करणारा एक डम्पर तेथील नागरिकांनी अडवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याची माहिती पत्रकाराना देण्यात आल्यावर पत्रकारांनी सदर माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांना दिल्यावर त्यांनी मंडळ अधिकारी अंभोरे यांना देहेण येथे पाठविले. त्यांनी पंचनामा करून वाळूसह हा डम्पर ताब्यात घेतला. सदर डम्पर दापोली पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात येणार असून दिवाळीची सुट्टी संपल्यावर त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली. दरम्यान आंजर्ले खाडीत पावसाळ्यातही वाळूचे बेकायदा उत्खनन सुरूच होते. सक्शन पंपाच्या सहाय्याने दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा करून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असूनही स्थानिक महसूल प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

टाइम्स स्पेशल

एकीकडे महसूल मंत्री जेथे बेकायदा वाळूचे सक्शन पंपाच्या सहाय्याने उत्खनन होईल तेथील तहसीलदार यांना निलंबित करण्यात येईल अशी घोषणा विधिमंडळाच्या अधिवेशनात करतात व राज्याचे महसूल राज्यमंत्री ज्या मतदारसंघातील आहेत त्यांच्याच मतदार संघात खुलेआम वाळूचा उपसा केला जात असल्याने कोणाच्या आशीर्वादाने हा वाळूचा उपसा केला जात आहे, याची चर्चा दापोली तालुक्यात होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg