सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारतरत्न प.प्पू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1932 या सावंतवाडी भेटीला उजाळा देण्यासाठी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीने घेतलेल्या "स्मृती विचार संवर्धन खुल्या वक्तृत्व स्पर्धेत "श्रावणी राजन आरावंदेकर प्रथम ,जेम्स डिसूझा द्वितीय तर चिन्मय असनकर, संग्राम कासले तृतीय ठरले आहेत. सदरची वक्तृत्व स्पर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान तथा समता प्रेरणाभूमीत रविवारी घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांच्या प्रमुख उपस्थितीत व समता प्रेरणाभूमी अध्यक्ष दीपक पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर समता प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीचे महत्त्व विशद केले. तर उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अरविंद वळंजु यांनी स्पर्धेतील स्पर्धकांचे विषय मांडण्याचे कौशल्य, सभाधिटपणा व व्यासंग याचे कौतुक करून भविष्यात ही मुलं निश्चितच राज्यातील एक प्रसिद्ध वक्ते बनतील असा आशावाद व्यक्त केला. तसेच समन्वय समितीचे उपाध्यक्ष चव्हाण यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तर अध्यक्षीय मनोगतात दीपक पडेलकर यांनी या पुण्यभूमीचे रूपांतर प्रेरणाभूमीत होण्यासाठी समता प्रेरणाभूमी सतत प्रयत्नशील असून येत्या काही वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीचे शतक महोत्सवी वर्ष साजरे होणार आहे याकडे लक्ष वेधले. या स्पर्धेत सुमारे पंधरा स्पर्धकांनी भाग घेतला.
या स्पर्धेचा निकाल, प्रथम क्रमांक श्रावणी राजन आरावंदेकर रोख रुपये २००० (पुरस्कृत दीपक पडेलकर), द्वितीय क्रमांक जेम्स डिसूझा रोख १५०० रुपये (पुरस्कृत ममता मोहन जाधव), तृतीय क्रमांक विभागून संग्राम कासले/ चिन्मय असनकर रोख १००० रुपये(पुरस्कृत भावना अनंत कदम), उत्तेजनार्थ : प्रथम शमिका राजन आरावंदेकर रोख ७५० रुपये (पुरस्कृत बुधाजी कांबळी), द्वितीय फिरदोस महिबुल्ला तैस रोख ५०० रुपये (पुरस्कृत वासुदेव जाधव), तृतीय दिया भिकाजी मसुरकर रोख ५०० रुपये (पुरस्कृत टीळाजी जाधव), या सर्व स्पर्धकांना सुनील कुणकेरकर व कांता जाधव यांनी सन्मानचिन्हे व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र पुरस्कृत केली होती. या स्पर्धेचे परीक्षक ॲड. सगुण जाधव व प्रसिद्ध निवेदक राहुल कदम यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. शेवटी कांता जाधव यांनी आभार मानले. यावेळी फुले, आंबेडकर चळवतील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.