सावंतवाडी (प्रतिनिधी) : भजनी परंपरेचा गौरव वाढवण्यासाठी, भजनी कलाकारांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि या लोककलेला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी 'भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग' या संस्थेची नुकतीच अधिकृतरीत्या नोंदणी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांसाठी ही एक अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना ठरली आहे. "लोककलेचा आवाज, संस्कृतीचा अभिमान" हे ब्रीद घेऊन कार्यरत होणाऱ्या या संस्थेची उद्दिष्टे अत्यंत व्यापक आहेत. भजनी कलाकारांना शासनस्तरावर अनुदान मिळवून देणे, 'स्वातंत्र्य भजन सदन' उभारणी करणे, शासकीय ओळखपत्रांची व्यवस्था करणे, शाळांमध्ये संगीत शिक्षकांची नेमणूक करणे, बाल भजन शिबिरे आयोजित करणे, जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण, संगीत वाद्यांची तरतूद तसेच भजन स्पर्धांसाठी एकसंध नियमावली तयार करणे अशा अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांद्वारे भजनी कलेचे संवर्धन करण्याचा निश्चय संस्थेने केला आहे.
बुवा श्री. संतोष कानडे (अध्यक्ष), बुवा श्री. गोपीनाथ लाड (सचिव), आणि श्री. सतीश रावराणे (खजिनदार) यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली ही संस्था कार्यरत आहे. कलाकारांविषयीची त्यांची निष्ठा आणि तळमळ सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. संस्थेचा पहिला कार्यक्रम मळगाव येथील पेडणेकर हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात संस्थेची अधिकृत ओळख, भविष्यातील उद्दिष्ट्ये आणि पुढील दिशा सर्वांसमोर स्पष्ट करण्यात आली. यावेळी उपस्थित भजनी कलाकारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर आणि त्यांच्या निवारणासाठी खुल्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद कामत, प्रेमानंद देसाई, संदीप नाईकधुरे, ज्ञानेश्वर मेस्त्री, हेमंत तवटे, कृष्णा राऊळ, दीपक पाळेकर, राजा सामंत, बाळू कांडरकर, सुरेश गावडे, नितीन नाईक, रुपेंद्र परब तसेच मळगाव ग्रामपंचायत सरपंच हनुमंत पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संस्थेच्या या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे मनापासून अभिनंदन केले आणि शासन स्तरावर आवश्यक तो पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले. भजनी कला ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. "भजन हे केवळ गाणे नाही, ती एक साधना आहे" या भावनेतून काम करणारी 'भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग' जिल्ह्यातील कलाकारांसाठी भविष्यात दीपस्तंभ ठरणार आहे. ही संस्था लोककलेला हक्काचा दर्जा मिळवून देईल आणि कलाकारांच्या श्रमांना समाजात नवी ओळख देईल, असा विश्वास संगीतप्रेमींनी व्यक्त केला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.