loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा पोलिसांची मोठी कारवाई, ३ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा जप्त

बांदा (प्रतिनिधी) - विलवडे येथे बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीवर बांदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा आणि ५ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण ८ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण महावीर बोराडे (३०, रा. मोडनिंब, सोलापूर) आणि राम नागनाथ माने (३५, रा. आष्टी, सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. रविवारी पहाटे विलवडे येथील शिवाजी पुतळा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या बोलेरो पिकअप (क्र. एमएच ४२ बीएफ ८२३४) मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तपासात ७५० मिली मापाच्या १२० बॉक्समधील १३२० बाटल्या जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश गवस, दादा परब, व विठ्ठल खरात यांच्या पथकाने केली. फिर्याद पोलीस हवालदार विठ्ठल खरात यांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg