loader
Breaking News
Breaking News
Foto

गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहणे काळाची गरज- पोलीस निरीक्षक मनोज सोनलकर

वैभववाडी (प्रतिनिधी) - ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी तसेच सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज सोनलकर यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस ठाण्याच्या वतीने संवादातून आधार या विषयावर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्यावतीने तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना दीपावली भेट वस्तू देऊन दिपावली गोड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ज्येष्ठ नागरिक तथा माजी सभापती बापी मांजरेकर, पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव, ज्येष्ठ नागरिक शांताराम रावराणे, महिला पोलीस माधुरी आडुळकर, छाया शिंगारे, ट्राफिक हवालदार अजित पडवळ, स. पो. उपनिरीक्षक आगा पोलीस शैलेश कांबळे, जितेंद्र कोलते आदी ज्येष्ठ नागरिक व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस निरीक्षक सोनलकर म्हणाले सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी पोलीस प्रशासनाची जी संकेत स्थळे आणि अ‍ॅप्स आहेत त्याचा वापर करून कशा तक्रारी कराव्यात, याविषयी सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेऊन, नियमित शारीरिक व्यायाम करावा मानसिक स्वास्थ चांगले राखण्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg