loader
Breaking News
Breaking News
Foto

कलंबिस्त प्रवेशाने भाजपात ईनकमींग होणार गतीमान

सावंतवाडी (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढत असताना राजकिय क्षेत्रात आपले भवितव्य घडवण्याची स्वप्ने पाहणार्‍यांना हजारो नवयुवकांना भाजपाचे आकर्षण प्रचंड वाढू लागले आहे. केवळ त्या सर्वांशी नेमक्या वेळी संवाद साधला तर कोकणातही भाजपात प्रवेश करणार्‍यांची रीघ लागेल हा विश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये बिंबवणारे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वावर विश्वास ठेवून, खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते विशाल परब यांच्या अथक प्रयत्नानी सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावच्या माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्यासंखेने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपा परिवारात प्रवेश करणार्‍या कलंबिस्त च्या सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रा.पं. सदस्य. रिया राजेश सावंत, मेधा तावडे, आणि शिवसेना (उ.बा.ठा.) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा बँक संचालक रविंद्र माडगावकर, माजी जिल्हा सदस्य पंढरी राऊळ, आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत, युवा मोर्चा आंबोली निलेश पास्ते, स्वप्नील राऊळ, पुंडलिक कदम, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg