loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐन दिवाळीत मडुरा, पाडलोस, सातोसे गावातील वीज गायब

बांदा (प्रतिनिधी) - महावितरणच्या हलगर्जी कारभाराचा फटका सातोसे, मडुरा, पाडलोस गावातील ग्रामस्थांवर दिवाळी काळोखात साजरी करण्याची वेळ आली आहे. दीपावली सणाच्या पूर्वसंध्येपासून दोन दिवस वीज गायब असल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत याबाबत सोशल मीडिया वरून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. महावितरणचे अधिकारी मात्र नॉट रिचेबल आहेत. महावितरणचा गोंधळी कारभार कायमच वीज ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. सातोसे, मडूरा गावात रविवार संध्याकाळपासून दोन दिवस वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे दिवाळी सण काळोखात साजरा करण्याची नामुष्की येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दीपावली हा मुळात दिव्यांचा, प्रकाशाचा सण मानला जातो. या सणानिमित्त घराघरात आकर्षक विद्युत रोषणाई, आकाश कंदील लावले जातात. मात्र पाडलोस, सातोसे व मडूरा गावात वीज पुरवठा गायब झाल्याने दिवाळी काळोखात साजरी करावी लागत आहे. सावंतवाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे व बांदा सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर नॉट रिचेबल झाले आहेत. वीज समस्या उद्भवल्यास ग्राहकांना अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध व्हावा यासाठी महावितरण कडून वर्तमानपत्रातून जाहिरात दिल्या जातात. मात्र अधिकाऱ्यांची मानसिकताच काम करण्याची नसेल तर काय करायचे ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg