सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी ’मेक इन कोकण’ या उपक्रमाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५ चा शुभारंभ सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला. बचतगटांच्या उत्पादनांपासून ते सर्व क्षेत्रातील कोकणवासीय उद्योजकांच्या उत्पादनांना लोकाभिमुख करणारे हे भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचा प्रारंभ पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार, बेरोजगारांना व्यावसायिक दिशा देणे आणि स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी मानून वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेला प्राधान्य देत, कोकणाला ’आत्मनिर्भर’ बनवण्याचा निर्धार युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.
’मेक इन कोकण’ या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, महिला मंडळ अध्यक्षा मोहिनी मडगावकर, नगरसेविका दीपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, सरचिटणीस दिलीप भालेकर, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख अमित गवंडळकर, बूथ अध्यक्ष विजू साटेलकर, रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सुकन्या टोपले, नयना सावंत, मेघना साळगावकर, अनुषा मेस्त्री, ज्योती मुद्राळे यांच्यासह सावंतवाडीतील नागरिक, उद्योजक, युवा, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.