loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून साकारले देखणे आकाश कंदील

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील एकमेव पीएमश्री स्कूल वेळणेश्वरच्या इको क्लबच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पक वृत्तीला व सृजनशीलतेला वाव देण्यासाठी पर्यावरणपुरक आकाश कंदील निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, शालेय विद्यार्थ्यांनी आपल्यातील हस्तकलेचे कौशल्य दाखवत एकाहून एक सरस आकाश कंदील बनवले. व्होकल फॉर लोकलच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचे किंवा मेड इन चायना आकाश कंदील न घेता टाकाऊ पासून टिकाऊ ते पर्यावरणपुरक कागदी आकाश कंदील तयार करून स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळीचा संदेश या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दिला. स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी ही संकल्पना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे जीवनशैलीत वसुंधरेला पूरक असणारे वर्तनात्मक बदल घडवून आणणे यासह स्वच्छ व पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यावर भर देते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये हस्तकलेची आवड, निरीक्षणशक्ती व कल्पकतेत वाढ, पर्यावरणाप्रती, समुदायाप्रती संवेदनशीलता व जबाबदारीची भावना निर्माण होत असल्याची भावना यावेळी प्रशालेच्या सर्व शिक्षकवृंदानी व्यक्त केली. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी पीएमश्री स्कूल वेळणेश्वर चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, पदवीधर शिक्षिका शैलजा साळे, पदवीधर शिक्षक बिपिन विचारे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे-राशिनकर, उपशिक्षिका भारती गोवेकर शिक्षण सेविका प्रियंका पवार अंजुम शेख तेजस्विनी जगताप यांनी विशेष मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg