संगलट खेड (इक्बाल जमादार) - दीपावलीच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणार्या तर पुणेकडून कोकणात तसेच पर्यटक नागरिकांची मोठी गर्दी सुरू झाली असून, शनिवारी सकाळ पासूनच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला. माणगाव परिसरात तर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अचानक वाढलेल्या वाहनतळामुळे चाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी माणगाव पोलीस व वाहतूक पोलीस शाखेने कंबर कसली. सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खासगी गाड्या, एसटी बस, दुचाकी आणि ट्रॅव्हल्सच्या वाहनांनी महामार्गावर गर्दी केली होती. माणगाव शहराजवळील फाटा, बायपास परिसर तसेच टोल नाक्याजवळ वाहने थांबून असल्याने महामार्गावर अडथळे निर्माण झाले.
सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत वाहनांची लांबच लांब रांग लागल्याने प्रवाशांनाअडचणींचा सामना करावा लागला. माणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की, दीपावलीच्या सुट्ट्या सुरू होताच मुंबईहुन गावाकडे जाणार्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. स्थानिक वाहतूक विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून वाहन चालकांना मार्गदर्शन करत होते. वाहनांची रांग माणगाव पासून खरवली फाटापर्यंत वाढल्याने पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले.
काही ठिकाणी वाहनचालकांकडून बेशिस्तपणे ओव्हरटेक केल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती. या दरम्यान महामार्गावरील माणगाव बाजारपेठेतील नाक्यावरही मोठ्या रांगा लागल्या. नागरिकांनी प्रवासापूर्वी वेळेचा अंदाज घेऊन निघावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. संध्याकाळपर्यंत वाहतूक काहीशी सुरळीत झाली असली तरी पुढील दोन दिवसांत गर्दा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत. सणासाठी आपल्या गावी जाणार्या नागरिकांच्या उत्साहामुळे दीपावलीपूर्वीच महामार्गावर सणासुदीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या गर्दीन प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.