गेल्या काही काळापासून विमान अपघातांच्या सख्येत वाढ झाली आहे. अहमदाबाद विमान अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता चीनमध्ये एका विमानाला हवेत आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानात आग लागल्यामुळे लोकांना आरडाओरडा सुरु केला, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. समोर आलेल्या माहितीनुसार हांग्झोहून इंचॉनला जाणाऱ्या एअर चायनाच्या विमानाच्या केबिनमध्ये आग लागली होती. एअर चायनाने याबाबत एक निवेदन जारी करत म्हटले की, हांग्झोहून इंचॉनला जाणाऱ्या फ्लाइट CA139 मध्ये आग लागली होती. एका प्रवाशाच्या बॅगेत लिथियम बॅटरी होती, ही बॅग ओव्हरहेड डब्यात ठेवलेली होती. या बॅटरीमुळे अचानक आग लागली. त्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमान इंचॉन विमानतळावर उतरणार होते. मात्र हवेत असताना या विमानात आग लागली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्स ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तसेच इतर प्रवासी आरडाओरडा करत असल्याचे दिसत आहे. काही प्रवाशांनी सांगितले की, आधी स्फोट झाला आणि नंतर आग लागली. आग लागल्यानंतर क्रूने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत आणि कोणीही जखमी झालेले नाही. त्यामुळे मोठी हानी टळली.
याआधीही अनेकदा विमानात बॅटरीला आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. चीनमधीलच हांग्झोहून शेन्झेनला जाणाऱ्या चायना सदर्न एअरलाइन्सच्या विमानातील एका प्रवाशाच्या कॅमेरा बॅटरी आणि पॉवर बँकमधून धूर निघत होता. त्यामुळे या विमानाला हांग्झोकडे परताने लागले होते. जानेवारीमध्ये, दक्षिण कोरियाही पॉवर बँकमुळे आग लागल्याची घटना घडली होती. यात काही प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, आता चीनने विमान प्रवासासाठी लिथियम बॅटरी आणि पॉवर बँकबाबत नियम कडक केले आहेत. सुरक्षा सर्टिफिकेट नसणाऱ्या पॉवर बँकवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच विमान प्रवासात कोणतेही उपकरण चार्ज करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तहीही असे अपघात घडताना दिसत आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.