loader
Breaking News
Breaking News
Foto

चौके मांडखोल शाळेच्या मुलांकडून दिवीजा वृद्धाश्रमास आभारपत्र

मालवण (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके मांडखोल या शाळेतील सर्व मुलांना दिवीजा वृद्धाश्रम असलदे गावठाणवाडी ता. कणकवली कडून दिवाळीसाठी सुगंधी उठणे वाटप करण्यात आले. त्यानिमित्ताने सर्व मुलांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून या अबालवृद्धांनी तयार केलेल्या कामाप्रती आभारपत्र लिहून दिवाळीचा गोड संदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्याच्या आधुनिक युगात पत्रलेखन कालबाह्य होत असताना मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेले हे नाविन्यपूर्ण काम कौतुकास्पद आहे. सदर उपक्रमासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. सुषण ढवण व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मुख्याध्यापक श्री. दिपक गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. सदरच्या उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक व माजी विद्यार्थी चौके मांडखोल यांनी कौतुक केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg