loader
Breaking News
Breaking News
Foto

गंभीर आजाराने त्रस्त बालिकेसाठी मातृत्व आधार फाऊंडेशनकडून मदतीचा हात

मालवण (प्रतिनिधी) - मालवण राजकोट येथील रहिवासी श्री. निलेश किशोर चिंदरकर यांची २ वर्षीय मुलगी वैष्णवी चिंदरकर ही ब्रेन ट्युमर या गंभीर आजाराने त्रस्त असून तीच्या उपचारासाठी मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या मार्फत दात्याच्या सहकार्याने चिंदरकर कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैष्णवी चिंदरकर ही दोन वर्षीय बालिका ब्रेन ट्यूमर आजाराने त्रस्त असून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या तिच्या आजारावर गेली दीड वर्षे विविध ठिकाणी उपचार सुरू असून सध्या बांबोळी हॉस्पिटल, गोवा आणि घरी आणल्यावर मालवणचे डॉ. हरीश परुळेकर तिच्यावर उपचार करीत आहेत. तिचे वडील मच्छिमार बोटीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून वैष्णवीच्या उपचारांचा खर्च कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. या कठीण प्रसंगात चिंदरकर कुटुंबांना काही ठिकाणाहून थोडीफार मदत मिळाली. चिंदरकर कुटुंबियांवरील या संकटाबाबत माहिती मिळताच मातृत्व आधार फाऊंडेशन या संस्थेने मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला सुमारे ४० दात्यानी आपापल्या परीने आर्थिक मदत केली. ही आर्थिक मदत संस्थेच्या वतीने जमा करून रु. २३ हजार ६०१ एवढी रक्कम चिंदरकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदत म्हणून सुपूर्द करण्यात आली. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, संजय हंजनकर, सौ.राधिका मोंडकर, पंकज पेडणेकर आदी व इतर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg