loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा शहरातील युवकांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन,विकासाभिमुख कार्यपद्धतीने आणि सर्व समाज बांधवांना समान न्याय देणाऱ्या सामंत यांच्या भुमिकेने प्रेरित होऊन लांजा शहरासह परिसरातील युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी नव्याने प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत करत सांगितले की, "शिवसेना ही सर्वसामान्य जनतेची आणि प्रत्येक धर्माच्या, समाजाच्या बांधवांची सेना आहे. लांजा शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करणे हेच आमचे ध्येय आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कनगवली ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर , अरबाज नेवरेकर ,अक्षय सागवेकर,रिजवान मापारी, आरिफ चिखली, कैफ मनियार, राजू तुळसणकर, संतोष कुंभार, साहिल वणू, तरबेज दसुरकर, तौसिम मापारी, मोहम्मद याहू, मंगेश कुंभार, आलीम मापारी, शफी मापारी आदी कार्यकर्ते यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. लांजा शहरासह परिसरातील युवकांचा शिवसेना पक्षाकडे कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आमदार किरण सामंत यांच्या कार्यकाळात सर्व समाजघटकांना समान न्याय मिळावा, विकास सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या योजनांमुळे मुस्लिम समाजातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक तरुणांच्या म्हणण्यानुसार, "आमदार सामंत हे सर्व धर्मांतील नागरिकांना एकसमान न्याय देतात आणि नेहमी सर्वांच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे आम्ही शिवसेनेवर विश्वास ठेवला, असल्याचे" प्रवेश कर्ते यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg