loader
Breaking News
Breaking News
Foto

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत गवसची विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा ओरोस क्रीडासंकुल येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु.वसंत संदिप गवस याने तिसरा क्रमांक मिळवून विभागस्तरावर धडक मारली . कु.वसंत गवस विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कु . वसंत याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा तसेच त्याच्या पालकांनीही मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . वसंत गवस याचे अभिनंदन केले व सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg