loader
Breaking News
Breaking News
Foto

काळेथर येथे भात पीक कापणीबाबत मार्गदर्शन

मालवण: (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील काळेथर येथील शेतकरी जयवंत मयेकर यांच्या भात प्रक्षेत्रावर पीक कापणी प्रयोग झाला. सदर कापणी प्रयोगावेळी सिंधुदुर्गचे कृषी उपसंचालक सिंधुदुर्ग ज्ञानेश्वर बढे यांनी पर्यवेक्षण तसेच मार्गदर्शन केले. पिकाची उत्पादकता ठरवण्यासाठी दरवर्षी प्रत्येक महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग घेतले जातात असे त्यांनी या कापणी प्रयोगारम्यान सांगितले तसेच सदर कापणीवेळी त्यांनी स्वतः वैभव विळ्याने भात कापणीचा अनुभव देखील घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र भात कापणी हंगाम सुरु आहे परंतु हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस तसेच शेत मजुरांची असलेली कमतरता लक्षात घेता पिकाची वेळेत काढणी होत नाही म्हणूनच शेतकऱ्यांनी आता कृषी यांत्रिकीकरणाचा अवलंब केला पाहिजे असेही ज्ञानेश्वर बढे यांनी उपस्थितांना सांगितले. यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असेलेल्या कृषी समृद्धी या योजनेमधून कृषी यंत्रे व अवजारे खरेदीसाठी मिळणाऱ्या ४०-५० टक्के अनुदानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी उपकृषी अधिकारी मालवण धनंजय गावडे, पोलीस पाटील काळेथर प्रियांका वाक्कर, पीक विमा प्रतिनिधी प्राणिल नार्वेकर, कृषी सेवक मालवण किशोर कदम, शेतकरी जयवंत मयेकर, सचिन करंगुटकर, दिलीप मयेकर, कालिदास मयेकर, अभिषेक आचरेकर,चंद्रशेखर मयेकर, बजरंग मयेकर तसेच काळेथर मधील इतर शेतकरी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg