loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली शहराकडे येणार्‍या मुख्य रस्त्यावरच कचर्‍याचे साम्राज्य!

संगलट-खेड (इक्बाल जमादार) - ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि शांत, सुंदर किनार्‍यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दापोली हिल टॉप परिसरात शहराकडे येणार्‍या मुख्य रस्त्यावरच सध्या कचर्‍याचे साम्राज्य पसरले असल्याने पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः, खेड-दापोली मुख्य महामार्गावर, एचपी पेट्रोल पंपासमोर, दापोली शहराकडे येणार्‍या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, यामुळे शहराच्या स्वच्छ प्रतिमेला मोठा तडा जात आहे. पर्यटनस्थळ म्हणून दापोलीची ओळख आहे आणि येथे वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, खेडकडून दापोलीकडे येताना, शहराच्या वेशीवरच अनेक दिवसांपासून कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, आणि इतर टाकाऊ वस्तूंचे ढीग साचले आहेत. हा कचरा रस्त्यालगत आणि प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असल्याने, ये-जा करणार्‍या प्रत्येकाला, विशेषतः पर्यटकांना, अत्यंत वाईट अनुभव येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg