दि.२० ऑक्टोबर सोमवार रोजी दीपावलीचा पहिला दिवस असला तरी स्वरूपानंद पतसंस्थेचे सर्व व्यवहार सुरू राहणार असून सभासद ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छा प्रत्यक्ष देण्यासाठी तसेच दसरा दिवाळी ठेव योजनेचा अखेरचा दिवस असल्याने ठेवीदारांना गुंतवणुकीची संधी साधता यावी यासाठी सोमवार दि.२० ऑक्टोबर रोजी स्वरूपानंद पतसंस्थेची सर्व कार्यालये सुरू राहतील. दसरा दिवाळी ठेव योजनेला गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद प्राप्त झाला आहे. संस्थेच्या एकूण ठेवी रु.३८८ कोटी झाल्या असून दसरा दिवाळी ठेव योजनेमध्ये रुपये ८ कोटींच्या ठेवी नव्याने जमा झाल्या आहेत.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर स्वरूपानंद पतसंस्थेच्या विशाल अर्थ कुटुंबासाठी स्वरूपानंदची आर्थिक घौड दौड विशद करताना मनापासून आनंद होत आहे. २७६ कोटींची कर्ज, ३८८ कोटींच्या ठेवी, १७० कोटींच्या बँक गुंतवणूका, २८.२४% भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण आणि ५४ कोटींचा स्वनिधी, सलग ३३ व्या वर्षी प्राप्त झालेला 'अ' ऑडिट वर्ग, ९९.६९% इतकी सप्टेंबर २०२५ अखेरची वसुली अशा उत्तम आर्थिक स्थितीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातले अर्थकारण सातत्यपूर्ण मार्गक्रमण करीत आहे. या पार्श्वभूमीवर समस्त सभासदांना, ग्राहकांना दीपावलीच्या शुभकामना देताना आनंद होत आहे असे ॲड. पटवर्धन म्हणाले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.