loader
Breaking News
Breaking News
Foto

लक्ष्मीकांत पाटील यांचा जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूरकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

दापोली (प्रतिनिधी) : दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मीकांत पाटील यांना जनकल्याण आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री.पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर वराडकर बेलोसे महाविदयालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांसह दापोलीत कौतुकाच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दापोली येथील न.का. वराडकर कला , रा.वि. बेलोसे वाणिज्य आणि शांतीलाल जैन विज्ञान महाविद्यालयात १९९७ पासून कार्यरत असलेले श्री.पाटील हे एम.ए. बी. एड., एम, फिल झाले आहेत. महाविद्यालयात "आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण" हा विभाग चालू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी सलग पाच वर्षे राष्ट्रीय सेवा योजना कार्य विभागाचा कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी रित्या पदभार सांभाळला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग रत्नागिरी जिल्हा समन्वयक म्हणूनही ते कार्यरत आहेत. जिल्हा समन्वयक म्हणून कार्य करताना खेड येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे नवीन युनिट त्यांनी सुरू केले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे ते केंद्र संयोजक म्हणून ते कार्यरत आहेत .यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक म्हणून कार्य करीत असताना विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन झाले आहे. एम .ए .लोकप्रशासन हा विषय सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.रुग्ण सहाय्यक हा एक वर्षाचा कोर्सही त्यांच्या कारकिर्दीत सुरू करण्यात आला . केंद्र संयोजक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर फक्त १५० विद्यार्थी होते .आज अभ्यास केंद्रामध्ये बी ए ,बी कॉम, एम ए (लोकप्रशासन) आणि रुग्ण सहाय्यक यामध्ये २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र विचार मंचाचा आजीवन सदस्य म्हणून ते कार्यरत आहे . अशा या महत्वपूर्ण योगदान दिलेल्या शिक्षक पाटील यांच्या शिक्षणातील योगदानाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवून खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा सन्मान झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg