कल्याण - आयशर टेम्पोमधुन अवैध गुटखा, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतुक करणार्या आरोपीच्या मुसक्या आवळुन त्याच्याकडुन एकुन ८७,३७,४७२ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, युनिट ३, कल्याणचे पथकास यश, गुजरात राज्यातुन टेम्पोमधुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीररित्या वाहतुक करून विक्री केली जात असल्याबाबत गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, युनिट ३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अमलदार यांच्या पथकाने दिनांक १७/१०/२०२५ रोजी ०५:३० वाजता गांधारी ब्रिज चौक, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी नाव धनराज रामगोपाल स्वामी, राहणार वार्ड नंबर १३ मुक्काम पोस्ट लालासी, तालुका लक्ष्मणगढ़, जिल्हा शिकर, राज्य राजस्थान हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमधुन प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर वाहतुक करताना मिळून आला.
त्याचेकडुन एकुण ८७,३७,४७२ रुपये किमतीचा अवैध गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व टेम्पो हस्तगत करण्यात पोलीस पथकास यश आले आहे. सदरची कामगिरी आशुतोष हुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरकर, पोलीस हवालदार सुधीर कदम, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, सचिन भालेराव, गोरक्षनाथ पोटे, विलास कडू, आदिक जाधव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंदारे, सचिन कदम, प्रविण किनरे, दिपक महाजन, पोलीस शिपाई मिथुन राठोड, सतिश सोनवणे, गुरुनाथ जरग, विनोद बन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण यांनी केलेली आहे. आमचे प्रतिनिधी रविंद्र जाधव कोतापकर कल्याण.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.