मालवण (प्रतिनिधी) - नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने प्रथमच घेण्यात आलेल्या भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला चिमूरड्यांपासून थोरा मोठ्यापर्यंतच्या स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच, परंतु नागरिकांनीही या अभिनव उपक्रमाचे स्वागत करताना या स्पर्धेतील विजेत्यांकरवी नरकासुर दहन केले. या लहान गटात स्पर्धेत नाविण्य जितेंद्र मेस्त्री याने तर महिला खुल्या गटात निर्भया जाधव आणि पुरुष खुल्या गटात ऍड. प्रथमेश रत्नाकर सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकावित विजयी चषकावर आपले नाव कोरले. दिवाळी उत्सवात भगवान श्रीकृष्णाच्या कथांवर आधारित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने घेतलेली ही वेशभूषा स्पर्धा जिल्ह्यातील पहिलीवहिली स्पर्धा ठरली आहे. मालवण येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने काल रात्री भरड नाका येथे भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संयोजक प्रशांत हिंदळेकर, सहसंयोजक भाऊ सामंत, ड. समीर गवाणकर, सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, बबन शिंदे, बंटी केनवडेकर, अमित खोत, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, संदीप बोडवे, यतीन खोत, शिल्पा खोत, स्नेहा आचरेकर, स्मृती कांदळगावकर, भूषण साटम, आप्पा लुडबे यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी भाऊ सामंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मालवणचे प्रसिद्ध ऍड. समीर गवाणकर आपल्या धर्मातील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यावर भर द्यायला हवा. तरच आपला देश, समाज संघटित होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुढे चांगले दिवस येतील. अन्यथा जाती-जातीमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये, निरनिराळ्या भेदांमध्ये विभागले जाऊन शत्रू राष्ट्रे त्याचा गैरफायदा घेतील. त्यामुळे सर्वांनी सावध राहायला हवे, असे सांगितले. तर पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या या उपक्रमाचे स्वागत केले. महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका महत्त्वाची होती कारण त्यांनी सत्य, असत्य काय आहे हे त्यांनी महाभारतात दाखवून दिले आहे, असे सांगत त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. हिंदू सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने यावर्षीपासून जो उपक्रम हाती घेतला आहे, त्याला शुभेच्छा देण्याबरोबरच हा उपक्रम उत्तरोत्तर वाढत जावो, अशी सदिच्छाही जगताप यांनी व्यक्त केली. स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- बालगट- हृदयांश फाटक, दक्ष मांजरेकर, उत्तेजनार्थ- अनुश्री मेस्त्री, अंश ढवाळी, हरमलकर ग्रुप, आसरा सातार्डेकर, विहान साळसकर. खुला गट पुरुष- हार्दिक परुळेकर, प्रसाद शिरोडकर. खुला गट महिला- रेवा जोशी, हर्षदा पाडगावकर, उत्तेजनार्थ- अश्विनी आचरेकर, सई कांबळी. विशेष प्राविण्य- अनिता आळवे, सुरेखा बिलये.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रफुल्ल देसाई, संजय शिंदे, शुभदा टिकम यांनी काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे चषक उद्योजक भूषण साटम यांनी पुरस्कृत केले होते. पारितोषिक वितरण समारंभास शिल्पा खोत, स्मृती कांदळगावकर, तारका चव्हाण, महेश कांदाळगावकर, केदार झाड, मोहित झाड, राजू बिडये, संजय गावडे, मोहन वराडकर, ललित चव्हाण, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अन्वेशा आचरेकर, स्नेहा आचरेकर, महिमा मयेकर, अमृता फाटक यांच्यासह अन्य सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी हरिश पडते, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, अमोल गावडे, शुभम मेस्त्री यांच्यासह हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन करत विनोद सातार्डेकर यांनी आभार मानले. स्पर्धा संपल्यानंतर प्रथम विजेत्या स्पर्धकांच्या हस्ते नरकासुराचा प्रतिमेचे दहन करत श्रीकृष्णाचा जयजयकार करण्यात आला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.